वर्ष: वाय
-
दिलासादायक पाऊस आणि पाणी नियोजनाचे महत्व

यावर्षी पावसाचे शुभवर्तमान ध्यानात घेत असतानाच धरणातील पाण्याच्या विसर्गाचे शास्त्रीय सूत्र योग्य पद्धतीने अमलात आणले पाहिजे. संकट महापुराचे असो की कोरोनाचे असो ते दैवी, नैसर्गिक नसते .तर ते फक्त आणि फक्त मानवनिर्मित असते .हे पक्के ध्यानात घ्यावेच लागेल. आपल्या चुकांची खापरे दुसऱ्यावर फोडण्यात आपण माहीर आहोत .पण आता ते बदलावे लागेल .कारण ही संकटे माणूस…
-
सर्वसामान्य माणसांचा : कवी सुरेश भट

मानवी मनोव्यापारांबरोबरच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात ज्यांची लेखणी अर्धशतकाहून अधिक काळ चौफेर सिद्धहस्त राहिली. अनेक अजरामर कविता ,गझला ,गाणी यांनी मायमराठी समृद्ध केली. ज्यांचा उल्लेख शास्त्रशुध्द मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती म्हणून करावा लागेल त्या द्रष्ट्या कवीचा अर्थात सुरेश भट उर्फ दादा यांचा बुधवार ता. १५ एप्रिल २०२० रोजी ८८ वा जन्मदिन आहे…
-
माणगाव परिषदेची शताब्दी

‘माणगाव ‘परिषदेची शताब्दी २१ मार्च २०२० रोजी साजरी होते आहे.डॉ.आंबेडकरांनी या परिषदेनंतर डीएससी ,बॅरिस्टर या पदव्या प्राप्त केल्या.’बहिष्कृत हितकारणी ‘संस्था काढली .महाडचा सत्याग्रह केला, मनुस्मृती जाळली, काळाराम मंदिर सत्याग्रह केला. व्हाइसरॉयच्या मंत्रिमंडळात ते ‘मजूर मंत्री ‘झाले .स्वतंत्र भारताचे ते पहिले ‘कायदेमंत्री’ झाले .भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला .पण या साऱ्याचा प्रारंभबिंदू म्हणून…
-
महिला दिन आणि सावित्रीबाई स्मृतीदिन

८ मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो .तर १० मार्च हा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन असतो. जागतिक महिला दिनाचा आशय आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवन संदेश जाणून घेऊन, त्याचा आजच्या संदर्भात अन्वयार्थ लावून आपला वर्तन व्यवहार करणे ही सावित्रीच्या लेकींची आणि लेकरांची जबाबदारी आहे…
-
राष्ट्रीय विज्ञान दिनाचा संदेश

आज वैज्ञानिक दृष्टिकोना अभावी लाखो- करोडो माणसे संकटमुक्त होणाऱ्या उपायांच्या शोधात भटकत भटकत अधिकाधिक संकटग्रस्त होत आहेत.विज्ञान ही चर्चेची, इतरांना सांगण्याची, शिकवण्याची गोष्ट आहे पण ती आचरणात आणण्यासाठी नाही असे मानणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याला प्रतिष्ठाही मिळत आहे ,हा एक अव्वल दर्जाचा राष्ट्रीय प्रश्न आहे…
-
राजकारणातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक

गेल्या पंधरा वर्षात संसदेतील कलंकित आणि गंभीर गुन्हे असलेले खासदार यांचे प्रमाण कमालीच्या वेगाने वाढत आहे.२००४ मध्ये हे कलंकित २४ टक्के तर गंभीर गुन्हे असलेले १२ टक्के खासदार होते.२००९ मध्ये हे प्रमाण ३० व १४ टक्के होते,२०१४ मध्ये ३४ व २१ टक्के होते आणि २०१९ मध्ये ४३ व २९ टक्के झाले आहे.पंधरा वर्षात हे प्रमाण…
