कॅटेगरी: Poetry
-
प्रेमऋतुच्या पखरणीपूर्वी
” गझल प्रेमऋतुची ” हा गझल संग्रह मराठी गझल विश्वात सादर करण्यामागे एक निश्चित भूमिका आहे. तसेच हा अनेकार्थांनी एक वेगळा प्रयोगही आहे. एकविसाव्या शतकातील २०२० व २१ ही गेली दोन वर्षे विश्वातील बहुतेक मानवजात कोव्हिड – १९ च्या भयावह संकटातून जात आहे. आजही ते भय पूर्णतः संपलेले नाही. या वैश्विक रोगराईचा फटका आपल्या भारताला…
-
” विटेवर ” गझलेचे मा.रामहरी पंडित यांनी केलेले रसग्रहण
◼️◻️◼️*गझलगंध…* *सुवर्णमहोत्सवी.भाग…5️⃣0️⃣*🎉🎉🎊🏮दि.,१० नोव्हेंबर २०२१.. बुधवार________________अतिथी गझलकार…*मा. प्रसाद कुलकर्णी* (इचलकरंजी, कोल्हापूर,)______________ रसग्रहण *रामहरी पंडित* ( *चंद्राशु*) कारंजा जि.वाशिम *९७६५०११२५१*_________________*काव्यप्रेमी शिक्षक मंच® आणि, काव्यप्रेमी गझल मंच*——–आयोजित————-गझलगंध उपक्रमातील.. *पन्नासाव्या* भागात…केंद्रिय मंच व गझल समितीतील मान्यवर पदाधिकारी, गझल मंचातील मान्यवर रसिक मित्रांनो… *सस्नेह नमस्कार*🙏_________________💫 *गझलगंध उद्देशिका*१)मान्यवर गझलकारांचा परिचय, त्यांच्या रचनांचा साहित्यिक दृष्टीने आस्वाद घेणे.२) रसग्रहण,अतिथी रचना व गझल प्रकारावर,…
-

नावाप्रमाणे नावाजलेला माणूस : बशर नवाज प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) तेज हो धूप तो और भी निखर आयेंगेहम कोई फुल नही जो मुरझा जायेंगे.. संघर्षासाठी सिद्ध असल्याचा पुकारासुद्धा अशा तरल शेराने करणार्या ज्येष्ठ शायर बशर नवाज यांचा आज सहावा स्मृतिदिन. १८ ऑगस्ट १९३५ रोजी औरंगाबाद मध्ये जन्मलेले बशर नवाज ९ जुलै…
-
गझल विधा : संकुचित मठ नव्हे तर व्यापक पीठ आहे

गझल विधा कोणाचा व्यक्तिगत अधिकार सांगणारी मालमत्ता नाही.ती सर्वव्यापी व सर्व स्पर्शी मानुष्य अभिव्यक्ती आहे. गझल हा कोणाचा संकुचित मठ नाही तर ते व्यापक पीठ आहे….गझलेबाबत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गझल हा एक काव्यप्रकार आहे.आपण गझल लिहितो म्हणजे कोणीतरी वेगळे आहोत हा गंड काहींनी चुकीच्या पद्धतीने जपला व वाढवला. कवी असल्याच्या अभिमानापेक्षा गझलकार…
-
तोंडओळख गझलेची
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० ) साप्ताहिक जनमंगल चा ‘माय बडी राइट्स ‘ हा उपक्रम अतिशय नाविन्यपूर्ण आणि अनुकरणीय आहे.याबद्दल सर्वप्रथम मी संपादक मंडळाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. या उपक्रमामध्ये मला ज्येष्ठ साहित्यिका गझलकारा प्रा.सुनंदा पाटील उर्फ गझलनंदा यांनी सहभागी करून घेतले याचा मला विशेष आनंद होतो आहे. याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतों.प्रा.सुनंदा पाटील व माझा…
-
‘गझलनंदा ‘ यांच्या गझलेतील स्त्री उद्गार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९० ) मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती आदरणीय सुरेश भट यांच्या जीवनदानी योगदानामुळे गेल्या अर्धशतकातमराठी गझलचा विस्तार अतिशय वेगाने होत आहे. सुरेश भटांनी उर्फ दादांनी गझलेची बाराखडी लिहून गझलेचे तंत्र आणि मंत्र सांगण्याचा पूर्णांशी प्रयत्न केला. गुरू – शिष्यत्वाचे कोणतेही अवडंबर न माजवता अथवा गंडाबंदत्वाचा कोणताही आग्रह न…
-
गझल लेखन स्पर्धेच्या परीक्षणाच्या निमित्ताने

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९०) गझल मंथन साहित्य संस्थेच्या वतीने सोमवार ता. ३० नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९ ते रात्री १२ या वेळेत आयोजित केलेल्या गझल लेखन स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आणि या उपक्रमास सदिच्छा देणाऱ्या सर्वाना सुरुवातीलाच मी धन्यवाद देतो.ज्येष्ठ गझलकारा उर्मिलामाई बांदिवडेकर यांनी या स्पर्धेसाठी प्रसुनांगी ( लगागागा,लगागागा,लगागागा, ) हे वृत्त सुचवले होते.…
-
विठ्ठलाचे ओवीरुपी स्वगत : कार्तिकी निमित्ताने

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) गुरुवार ता.२६ नोव्हेंबर २०२० रोजी ‘कार्तिकी एकादशी’ आहे.आषाढी व कार्तिकी वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैशिष्ट्य व संचित आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी आषाढी यात्रा होऊ शकलेली नव्हती.तब्बल आठ महिने सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे बंदच होती.ती नुकतीच दिवळीपासून काही अटींचे पालन करावे या विश्वासावर सुरू केली आहेत. यावर्षी कार्तिकी यात्रेसाठी राज्यातील कोणत्याही भागातून पंढरपूरला…
-
सर्वसामान्य माणसांचा : कवी सुरेश भट

मानवी मनोव्यापारांबरोबरच सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात ज्यांची लेखणी अर्धशतकाहून अधिक काळ चौफेर सिद्धहस्त राहिली. अनेक अजरामर कविता ,गझला ,गाणी यांनी मायमराठी समृद्ध केली. ज्यांचा उल्लेख शास्त्रशुध्द मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती म्हणून करावा लागेल त्या द्रष्ट्या कवीचा अर्थात सुरेश भट उर्फ दादा यांचा बुधवार ता. १५ एप्रिल २०२० रोजी ८८ वा जन्मदिन आहे…
-
पाऊस, कविता आणि भय

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५० ८३ ०२ ९०) पूर्वीच्या पावसामुळे इतका हाहाकार माजत नव्हता हे खरे,पाऊस हळुवार रोमँटिकतेकडून भयग्रस्त रोमांचीकरणाकडे वाटचाल करू लागलाय,अर्थात त्याला लोकसंख्या वाढी पासून प्रदूषणापर्यंत असंख्य कारणे आहेत.माणूस म्हणून आपले निसर्ग विरोधी वर्तनही त्याला जबाबदार आहे.आज सर्वांगीण भयावहतेत काही रस्तेच नव्हे तर काही माणसंही खचत आहेत , दरडींबरोबरच घरे,झाडेही कोसळत…