
अन्वयार्थ

प्रसाद माधव कुलकर्णी
समाजवादी प्रबोधिनी
५३६/१८, इंडस्ट्रियल इस्टेट
इचलकरंजी (४१६ ११५)
जि.कोल्हापूर ता.हातकणंगले
फोन: 98508 30290
ई-मेल: prasad.kulkarni65@gmail.com
जन्म: ०६/१२/१९६५
शिक्षण : एम.ए.( मराठी ) ‘पत्रकारिता व संवाद शास्त्र ‘आणि ग्रंथालय आणि महितीशास्त्र ‘ पदव्या प्राप्त….
१९८५ पासून ‘समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजी‘ चे कार्यकर्ते, १९९० पासून सुरु असलेल्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ मासिकाचे संपादक,परिवर्तनवादी पुरोगामी चळवळीत गेली अडतीस वर्षे सातत्यपूर्ण काम….
सामाजिक,आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक विषयांवर तीन हजारांवर लेख, शिवाजी विद्यापीठ ते श्रमिक प्रतिष्ठान अशा विविध प्रकाशनसंस्थांच्या वतीने तीस पुस्तके -पुस्तिका प्रकाशित….
मराठी कवितेत मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती कालवश सुरेश भट यांच्या मार्गदर्शनाखाली ‘गझलकार ‘या नात्याने गेली अडतीस वर्षे योगदान, ‘गझलांकित‘, ‘गझलसाद‘, ‘गझलानंद‘ , ‘गझल प्रेमऋतूची‘, ‘आमची गझलसाद‘ हे गझलसंग्रह आणि ‘चित्कलायन‘ हा दीर्घ कविता संग्रह प्रकाशित, या नावांचे स्वतंत्र गझल व कवितांचे जाहीर कार्यक्रमांचे सादरीकरण…
तसेच विविध विषयांवर हजारांवर व्याख्याने, विविध राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित…