वर्ष: वाय
-
सरत्या वर्षाचा भयांश आणि नववर्षाचा इच्छांश

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९० ) मा. पंतप्रधानांनी या वर्षातील शेवटच्या ‘ मन की बात ‘ या २७ डिसेंबर २०२० रोजीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आत्मनिर्भरतेचा नारा दिला. ते म्हणाले,’ कोरोनाच्या आपत्तीसह अनेक संकटे आणि आव्हाने येऊनही मावळत्या वर्षाने देशाला आणि देशवासीयांना आत्मनिर्भरता हे नवे सामर्थ्य दिले आहे.मात्र हे करत असताना दर्जाची तडजोड करता…
-
काँग्रेसच्या १३५ व्या वर्धापनदिना निमित्ताने

सोमवार ता. २८ डिसेंबर २०२० रोजी काँग्रेसचा १३५ वा वर्धापनदिन आहे.इतिहासात कधी नव्हे एवढ्या विकलांग अवस्थेत आज काँग्रेस आहे हे खरे आहे. १९ डिसेंम्बर २०२० रोजी काँग्रेसच्या प्रमुख मंडळींची बैठक श्रीमती सोनिया गांधी घेतली होती.आज काँग्रेसने व्यापक प्रमाणात जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवून जनतेशी नाळ अधिक घट्टपणे जुळवणे गरजेचे आहे.तशा शक्यतांचे अवकाश परिस्थितीने तयारही केले आहेत.नेते…
-
स्मारक व्हावेच असे संस्मरणीय गदिमा

ग.दि. माडगुळकरांचे पुणे,माडगूळ आणि शेटफळ येथे उचित स्मारक व्हावे यासाठी महाराष्ट्रभर त्यांचा कवितांचा जागर करून १४ डिसेंबर २०२० रोजी महाराष्ट्रातील कवी,लेखक,कळावंत,सुज्ञ रसिक आदींनी विविध ठिकाणीअभिनव आंदोलन केले ते अतिशय उचित होते. वास्तविक गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षात हे स्मारक पूर्ण व्हायला हवे होते.शासनाने त्याकडे गंभीरतेने पहायला हवे होते.प्रभू श्रीरामाला राजकारणाचा विषय बनविणे वेगळे आणि गीतरामायणकाराचे उचित स्मारक…
-
समाज प्रबोधक ज्ञानेश्वर

शनिवार ता. १२ डिसेंबर रोजी ज्ञानेशवर समाधी दिन आहे. समाजजीवनाला एका नव्या वाटेवर आणण्याचे युगप्रवर्तक कार्य ज्ञानेश्वरांनी केले.मनजागरणातून जनजागरण होईल हा खात्रीचा आशावाद त्यांनी मांडला.संत विचार वैभवाची ही दिंडी पुढे गेली पाहिजे.अर्थात हा पुढे जाण्याचा प्रवास स्वतःपासून सुरू करावा लागतो.चित्तशुद्धी आणि आत्मविकास ही या दिंडीत सामील होण्याची पूर्वअट आहे यात शंका नाही…
-
गझल लेखन स्पर्धेच्या परीक्षणाच्या निमित्ताने

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९०) गझल मंथन साहित्य संस्थेच्या वतीने सोमवार ता. ३० नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९ ते रात्री १२ या वेळेत आयोजित केलेल्या गझल लेखन स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आणि या उपक्रमास सदिच्छा देणाऱ्या सर्वाना सुरुवातीलाच मी धन्यवाद देतो.ज्येष्ठ गझलकारा उर्मिलामाई बांदिवडेकर यांनी या स्पर्धेसाठी प्रसुनांगी ( लगागागा,लगागागा,लगागागा, ) हे वृत्त सुचवले होते.…
-
सर्वव्यापी शेतकरी आंदोलन

कोणत्याही देशाची आर्थिक ,सामाजिक धोरणे आखताना सर्वसामान्य नागरिकांचे राहणीमान उंचावणे अपेक्षित असते. त्याच पद्धतीने पूर्ण रोजगार असणे ,विषमता कमीत कमी असणे ,जगणे सुसह्य असणे ,सामाजिक सुरक्षितता मिळणे, किंमती स्थिर ठेवणे, देशाच्या मूळ व्यवसायाला चालना देणे गरजेचे असते.पण आज ते होताना दिसत नाही.उलट सर्वांगीण समतेची मूल्यव्यवस्था बदलून विकृत विषमता वाढवली जात आहे.माणसाला वजा करून माणसाच्या विकासाची…
-
विठ्ठलाचे ओवीरुपी स्वगत : कार्तिकी निमित्ताने

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९०) गुरुवार ता.२६ नोव्हेंबर २०२० रोजी ‘कार्तिकी एकादशी’ आहे.आषाढी व कार्तिकी वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैशिष्ट्य व संचित आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी आषाढी यात्रा होऊ शकलेली नव्हती.तब्बल आठ महिने सर्व धर्मीय प्रार्थनास्थळे बंदच होती.ती नुकतीच दिवळीपासून काही अटींचे पालन करावे या विश्वासावर सुरू केली आहेत. यावर्षी कार्तिकी यात्रेसाठी राज्यातील कोणत्याही भागातून पंढरपूरला…
-
पंडित नेहरू: आत्मनिर्भरतेचे प्रणेते

देशाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर आजही ‘नेहरू मॉडेल ‘ विचारात घ्यावेच लागेल.आज ज्या आत्मनिर्भरतेची चर्चा सुरू आहे त्याचा पाया नेहरूंनी घातला आहे.’ कारखाने,उद्योग हीच खरी राष्ट्रीय मंदिरे ‘ ही त्यांची भूमिका ही आत्मनिर्भरतेची सर्वोत्तम व्याख्या होती व आहे.१४ नोव्हेम्बर २०२० रोजी त्यांचा १३१ वा जन्मदिन आहे.त्यानिमित्ताने…
-
पुलं : समग्रतेला व्यापून उरणारा कलावंत

पुलं उर्फ पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजे महाराष्ट्राच्या साहित्य, संगीत, चित्रपट, दूरदर्शन ,संस्कृती,दातृत्व अशा विविध क्षेत्रातील एक अष्टपैलू कलावंत. ” महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व “ही उपाधी जनतेने त्याला दिली होती. रविवार तारीख ८ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांचा १०१ वा जन्मदिन आहे. त्यानिमित्ताने…
