कॅटेगरी: Essay
-
सुभाषबाबूंचे १२५ वे जन्मवर्षं

भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सुभाषबाबूंनी फार मोठी कामगिरी केली.लोकांना संघटित करून ब्रिटिश साम्राज्यशाहीचा अंत करून शोषण विरहित समाजरचना प्रस्थापित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.आझाद हिंद सेना उभारून इतिहासाचे एक पान त्यांनी लिहिले.महान क्रांतिकारी व्यक्तित्व असलेल्या नेताजींच्या १२५ व्या जन्मवर्षाच्या प्रारंभदिनी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतांना एका अविस्मरणीय गोष्टीचा अभिमान वाटतो की, सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेत असलेल्या कॅप्टन…
-
मत ‘दान ‘ नको तर मताधिकार वापरूया

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) बंधू भगिनींनो, महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीसाठी मताधिकार बजावायचा आहे.मताधिकार बजावणे हे लोकशाहीच्या अनमोल ठेव्याच्या जोपासनेसाठी आणि त्याच्या बळकटीकरणा साठी आवश्यक आहे. त्यामुळे ज्यांना मताचा हक्क आहे तो त्यांनी बजावला पाहिजे.मताधिकार आपली ग्रामपंचायत कशी असावी या संबंधी लोकांनी आपल्या मताद्वारे प्रतिनिधींची निवड करण्यासाठी व्यक्त केलेली इच्छा, अशी इच्छा व्यक्त…
-
ट्रम्प यांचे विषारी राजकारण आणि लोकशाहीचे सरंक्षण

डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या बगलबच्या समर्थकांना लोकशाही मूल्याचा विसर पडला आहे.किंबहुना त्यांनी त्याला पद्धतशीरपणे बगल देण्याचा प्रयत्न केला आहे. लोकशाहीमध्ये अंतिम सत्ता जनतेची म्हणजे लोकांची असते. राजाची सत्ता असणारी राजेशाही असते तसेच लोकांची लोकांची सत्ता असणारी लोकशाही अभिप्रेत असते.डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या इतिहासातील अतिशय निर्लज्ज कृती केली आहे.याचे कारण त्यांच्या आक्रस्ताळ्या विचारधारेत व संकुचित व्यक्तित्वात…
-
काका नावाचा बापमाणूस

मा.विलासकाका पाटील ( उंडाळकर ) म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढा व भारतीय राज्यघटना यातील मूल्यांच्या संवर्धनासाठी सातत्याने झटणारा व प्रबोधन चळवळीला पुढे नेणारा लोकनेता. सोमवार ता.४ जानेवारी २०२१ रोजी पहाटे काका कालवश झाले.काकांच्या जाण्याने काँग्रेस पक्ष,पुरोगामी चळवळ,प्रबोधनापासून साहित्य चळवळीपर्यंत सर्व क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.आज एका अर्थाने ” काका नावाचा बापमाणुस ” आपण गमावला आहे. या थोर…
-
सरत्या वर्षाचा भयांश आणि नववर्षाचा इच्छांश

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९० ) मा. पंतप्रधानांनी या वर्षातील शेवटच्या ‘ मन की बात ‘ या २७ डिसेंबर २०२० रोजीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आत्मनिर्भरतेचा नारा दिला. ते म्हणाले,’ कोरोनाच्या आपत्तीसह अनेक संकटे आणि आव्हाने येऊनही मावळत्या वर्षाने देशाला आणि देशवासीयांना आत्मनिर्भरता हे नवे सामर्थ्य दिले आहे.मात्र हे करत असताना दर्जाची तडजोड करता…
-
काँग्रेसच्या १३५ व्या वर्धापनदिना निमित्ताने

सोमवार ता. २८ डिसेंबर २०२० रोजी काँग्रेसचा १३५ वा वर्धापनदिन आहे.इतिहासात कधी नव्हे एवढ्या विकलांग अवस्थेत आज काँग्रेस आहे हे खरे आहे. १९ डिसेंम्बर २०२० रोजी काँग्रेसच्या प्रमुख मंडळींची बैठक श्रीमती सोनिया गांधी घेतली होती.आज काँग्रेसने व्यापक प्रमाणात जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवून जनतेशी नाळ अधिक घट्टपणे जुळवणे गरजेचे आहे.तशा शक्यतांचे अवकाश परिस्थितीने तयारही केले आहेत.नेते…
-
स्मारक व्हावेच असे संस्मरणीय गदिमा

ग.दि. माडगुळकरांचे पुणे,माडगूळ आणि शेटफळ येथे उचित स्मारक व्हावे यासाठी महाराष्ट्रभर त्यांचा कवितांचा जागर करून १४ डिसेंबर २०२० रोजी महाराष्ट्रातील कवी,लेखक,कळावंत,सुज्ञ रसिक आदींनी विविध ठिकाणीअभिनव आंदोलन केले ते अतिशय उचित होते. वास्तविक गदिमांच्या जन्मशताब्दी वर्षात हे स्मारक पूर्ण व्हायला हवे होते.शासनाने त्याकडे गंभीरतेने पहायला हवे होते.प्रभू श्रीरामाला राजकारणाचा विषय बनविणे वेगळे आणि गीतरामायणकाराचे उचित स्मारक…
-
समाज प्रबोधक ज्ञानेश्वर

शनिवार ता. १२ डिसेंबर रोजी ज्ञानेशवर समाधी दिन आहे. समाजजीवनाला एका नव्या वाटेवर आणण्याचे युगप्रवर्तक कार्य ज्ञानेश्वरांनी केले.मनजागरणातून जनजागरण होईल हा खात्रीचा आशावाद त्यांनी मांडला.संत विचार वैभवाची ही दिंडी पुढे गेली पाहिजे.अर्थात हा पुढे जाण्याचा प्रवास स्वतःपासून सुरू करावा लागतो.चित्तशुद्धी आणि आत्मविकास ही या दिंडीत सामील होण्याची पूर्वअट आहे यात शंका नाही…
-
गझल लेखन स्पर्धेच्या परीक्षणाच्या निमित्ताने

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९०) गझल मंथन साहित्य संस्थेच्या वतीने सोमवार ता. ३० नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ९ ते रात्री १२ या वेळेत आयोजित केलेल्या गझल लेखन स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आणि या उपक्रमास सदिच्छा देणाऱ्या सर्वाना सुरुवातीलाच मी धन्यवाद देतो.ज्येष्ठ गझलकारा उर्मिलामाई बांदिवडेकर यांनी या स्पर्धेसाठी प्रसुनांगी ( लगागागा,लगागागा,लगागागा, ) हे वृत्त सुचवले होते.…
-
सर्वव्यापी शेतकरी आंदोलन

कोणत्याही देशाची आर्थिक ,सामाजिक धोरणे आखताना सर्वसामान्य नागरिकांचे राहणीमान उंचावणे अपेक्षित असते. त्याच पद्धतीने पूर्ण रोजगार असणे ,विषमता कमीत कमी असणे ,जगणे सुसह्य असणे ,सामाजिक सुरक्षितता मिळणे, किंमती स्थिर ठेवणे, देशाच्या मूळ व्यवसायाला चालना देणे गरजेचे असते.पण आज ते होताना दिसत नाही.उलट सर्वांगीण समतेची मूल्यव्यवस्था बदलून विकृत विषमता वाढवली जात आहे.माणसाला वजा करून माणसाच्या विकासाची…