कॅटेगरी: analysis
-
भारतीय लोकशाही समोरील आव्हाने

“भारतीय लोकशाही समोरील आव्हाने ” या विषयावर जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूरच्या वतीने शुक्रवार ता. ११ सप्टेंबर २०२० रोजी ‘ नॅशनल वेबिनार ‘आयोजित केला या वेबिनारचे प्रमुख वक्ते प्रसाद माधव कुलकर्णी यांच्या या भाषणाचा सारांश…
-
सरकार संख्यात्मक मजबूत पण गुणात्मक रामभरोसे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) केंद्र सरकारच्या सांख्यिकी विभागाने एप्रिल ते जून या तिमाहितील अर्थव्यवस्थेबाबतची आकडेवारी ३१ऑगस्टला जाहीर केली. त्यानुसार भारतीय अर्थव्यवस्था आजवरच्या सर्वात नीचांकी स्तरावर घसरलेली आहे. तब्बल २३.९ म्हणजे चोवीस टक्क्यानी अर्थव्यवस्था घसरणे हे अतिशय भयावह बाब आहे. कोरोनाचे संकट आणि त्यामुळे करावा लागलेला लॉक डाऊन ही कारणे या घसरणीमागे…
-
शिक्षक दिनाचा संदेश व नवे धोरण

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) शनिवार ता. ५ सप्टेंबर रोजी भारतीय शिक्षक दिन साजरा होत आहे.अर्थात गेल्या काही वर्षात क्रांतीबा महात्मा फुले यांचा जन्मदिनही शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. फुले दाम्पत्याचे शैक्षणीक क्षेत्रातील काम अतुलनीय आहे यात शंकाच नाही.मात्र गेली अनेक वर्षे शासकीय पातळीवर आजचा दिवसच ‘ शिक्षक दिन ‘ म्हणूनच…
-
बेरोजगारीचा कोरोनी अहवाल आणि पाच महिने

सेंटर फोर मॉनिटरिंग इंडियन इकॉनोमी( सीएमआई ) चा एक अहवाल नुकताच म्हणजे मंगळवार ता.१८ ऑगस्टला प्रसिद्ध झाला आहे.तो अहवाल वाढत्या बेरोजगारीवर मोठा प्रकाश टाकणारा व भयावहता अधोरेखित करणारा आहे. २३ ऑगस्टला लॉकडाऊनला पाच महिने पूर्ण होत आहेत. लॉक डाऊन च्या काळामध्ये जुलै अखेरपर्यंत जवळ-जवळ पावणेतीन कोटी लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. एकीकडे आत्मनिर्भरतेपासून जॉब…
-
स्वातंत्र्य आणि आपण

अत्यंत वाईट अवस्थेत असलेली अर्थव्यवस्था, पोखरून निघत असलेले उद्योग जगत, भरडुन काढत असलेली बेरोजगारी आणि उद्ध्वस्त होत असलेले समाजजीवन याची चर्चा ना माध्यमे करताहेत ना सत्ताधारी नेतेमंडळी वा कार्यकर्ते करत आहेत.उलट मंदिराच्या पायाभरणी पासून सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येपर्यंतचे विषय देशापुढील आजचे अव्वल प्रश्न म्हणून पुढे आणले जात आहेत. यात करोडो सर्वसामान्य माणसाचे प्रश्न पद्धतशीरपणे वगळले…
-
डॉ. रंगनाथन, भारतीय ग्रंथपाल दिन, महाराष्ट्रातील वास्तव

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) भारताच्या प्राचीन संस्कृतीत व इतिहासात ग्रंथालयांचे महत्व मोठे आहे.आधुनिक काळात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक म्हणून डॉ.शियाली रामामृतम उर्फ डॉ. एस.आर.रंगनाथन यांचे नाव मोठया आदराने घेतले जाते.त्यांचा जन्म मद्रास प्रांतातील तंजावर जिल्ह्यात शियाली या गावी ९ ऑगस्ट १८८२ रोजी झाला.मात्र दरवर्षी १२ ऑगस्ट हा दिवस त्यांच्या जन्मदिना प्रित्यर्थ…
-
“गांधी – किंग एक्सचेंज बिल” महत्वाचे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) अमेरिकन संसदेच्या परराष्ट्र व्यवहार समितीकडून २९ जुलै २०२० रोजी एक विधेयक मंजूर करण्यात आले.” गांधी – किंग एक्सचेंज बिल ” असे या कायद्याचे नाव आहे. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि अमेरिकन कृष्णवर्णीयांचे गांधी मार्टिन ल्यूथर किंग( जुनियर) यांचे कार्य व विचार वारसा पुढे नेण्यासाठी हे विधेयक उपयुक्त…
-
लॉकडाऊनचे चार महिने आणि घटनादत्त जबाबदारी

२३ जुलै रोजी कोव्हिडं-१९ मुळे केल्या गेलेल्या लॉक डाऊनला तब्बल चार महिने झाले आहेत. हा चार महिन्याचा कालखंड भारतासह जगाच्या इतिहासात एक अभूतपूर्व वेगळेपणा घेऊन आला. अशा काळातून आपल्याला जावे लागेल याची किंचितही कल्पना आजच्याच नव्हे तर मागच्या ही काही पिढ्यांनी केली नव्हती. आज जगामध्ये कोरोना विषाणूने बाधित झालेल्यांची संख्या दीड कोटींवर पोहोचली आहे. भारतामध्ये…
-
विकासदर शून्याखाली, गरिबांना कोण वाली ?

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) शुक्रवार ता. २२ मे रोजी रिझर्व बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी रेपो आणि रिव्हर्स दरामध्ये कपातीची घोषणा करतानाच भारताचा आर्थिक विकासदर प्रथमच शून्याखाली जाण्याची भीती व्यक्त केली. त्यांनी हेही स्पष्ट केले की, कोरोना संकटाच्या आधीपासूनच भारतीय अर्थव्यवस्थेला मंदीचा फटका बसू लागला होता.…
-
फसलेले आर्थिक धोरण आणि महाफसवे पॅकेज

आज संपूर्ण समाजव्यवस्थेचे नियंत्रण अर्थव्यवस्थेकडे गेले आहे.त्यामुळे राजकारणाचे अराजकीयीकरण ,संस्कृतीचे बाजारीकरण, शिक्षणाचे व्यापारीकरण ,माणसाचे वस्तूकरण, सामाजिकतेचे असामाजीकरण, कुटुंबव्यवस्थेचे दुभंगीकरण, व्यवस्थेचे कंगालीकरण ,सुदृढतेचे विकलांगिकरण आणि मोकळ्या श्वासाचे कोरोनीकरण अत्यंत वेगाने सुरू आहे.सरकारी अर्थनीती फसलेली आहे यात शंका नाही..