वर्ष: वाय
-
लोकमान्यांची स्मृतिशताब्दी

लोकमान्य टिळक हे अतिशय झुंझार नेते होते.प्रखर राष्ट्रवादी देशभक्त होते. भारतीय तत्वज्ञानाचे ख्यातनाम भाष्यकार होते.श्रेष्ठ दर्जाचे ग्रंथकार ,संपादक होते.असामान्य बुद्धिमत्ता लाभलेल्या टिळकांना गणित,तत्वज्ञान,इतिहास,संशोधन इत्यादींत गती होती.पण त्यांनी परिस्थितीची गरज ओळखून देशकार्यात वाहून घेतले.ते राष्ट्रीय नेते झाले.राजकीय हक्कांसाठी सर्वस्वाचा होम करणारे टिळक सामाजिक सुधारणांबाबत मात्र कमालीचे सनातनी होते हेही खरे.१ ऑगस्ट २०१९ पासून त्यांचे स्मृतिशताब्दी वर्ष…
-
माहिती अधिकार दुरुस्ती विधेयक :पारदर्शकतेला तडा

माहितीचा अधिकार चिरंजीवी विकासासाठी आणि प्रशासनातील पारदर्शकतेसाठी अतिशय महत्वाचा ठरत असतो.लोकशाही आणि लोकांचे सार्वभौमत्व या संकल्पनांना नवभारताच्या उभारणीत अनन्य साधारण महत्व आहे.त्या संकल्पनांना या कायद्यामुळे बळकटी प्राप्त होते.असे असताना माहितीच्या अधिकारात केंद्र सरकारला हस्तक्षेप करता येईल अशा दुरुस्त्या करणे म्हणजे पारदर्शकतेला बगल देणे आहे…
-
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे : एक झंझावात

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे म्हणजे एक विलक्षण प्रतिभेचा झंझावात.त्यांनी निर्माण केलेले साहित्य हे समाजातील शेवटच्या माणसाच्या शृंखला तुटाव्यात यासाठी आहे.आज अण्णा भाऊंचा पन्नासावा स्मृतिदिन आहे.तसेच १ ऑगस्ट पासून अण्णा भाऊंचे जन्मशताब्दी वर्षही सुरू होत आहे.त्या निमित्ताने…
-
अर्थसंकल्प २०१९-२० : रुपयाची वास्तवता, आणि डॉलरच्या चर्चेचे भ्रमजाल

प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी ( ९८ ५०८ ३०२९०) पूर्ण बहुमताने सत्तेत आलेल्या केंद्र सरकारचा २०१९-२० चा अर्थसंकल्प उच्चविद्याविभूषित असलेल्या आणि देशाच्या पहिल्या महिला अर्थमंत्री असलेल्या मा.निर्मला सीतारामन यांनी संसदेत शुक्रवार ता.५ जुलै रोजी सादर केला.२७ लाख ८६ हजार कोटी रुपयांचा हा अर्थसंकल्प मा.अर्थमंत्र्यांनी सव्वा दोन तास सलग भाषण करून मांडला.त्यांनी ‘गाव,गरीब आणि शेतकरी ‘ ही त्रिसूत्री…
-
गझल मंथन समूहाच्या गझल लेखन स्पर्धेच्या निमित्ताने…
प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी ( ९८ ५० ८३ ०२ ९०) मस्कार गझलकार बंधू भगिनींनो, “गझलमंथन ” च्या वतीने ३० जून २०१९ रोजी सकाळी ९ ते रात्री १२ यावेळेत आयोजित केलेल्या गझल लेखन स्पर्धेचे परीक्षण करण्याची संधी मला मिळाली याचा मनस्वी आनंद आहे.त्याबद्दल मा.अनिल कांबळे यांच्यासह या समूहाच्या सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे.तसेच या स्पर्धेला आपण मोठा प्रतिसाद…
-
“आर्टिकल-१५” : जात्यंधतेवरचा निःसंशय सर्जिकल स्ट्राईक

प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी ( ९८ ५० ८३ ०२ ९० ) “आर्टिकल -१५” हा २८ जून २०१९ रोजी रिलीज झालेला हिंदी चित्रपट म्हणजे इथल्या जात्यंध व धर्मांध व्यवस्थेवर अतिशय रोखठोक भाष्य करणारा आणि माणसाचं माणूसपण नाकारणाऱ्या या अमानुष व्यवस्थेचे जळजळीत वास्तव अधोरेखित करणारा एक महत्वाचा चित्रपट आहे. सवंग मनोरंजनाच्या मसाला फिल्मची बाजारपेठ वर्षानुवर्षे तुडुंब वाहतानाच्या आजच्या…
-
गझल मंथन समूहाच्या गझल लेखन स्पर्धेच्या निमित्ताने…
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५० ८३ ०२ ९०) नमस्कार गझलकार बंधू भगिनींनो, “गझलमंथन ” च्या वतीने ३० जून २०१९ रोजी सकाळी ९ ते रात्री १२ यावेळेत आयोजित केलेल्या गझल लेखन स्पर्धेचे परीक्षण करण्याची संधी मला मिळाली याचा मनस्वी आनंद आहे.त्याबद्दल मा.अनिल कांबळे यांच्यासह या समूहाच्या सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे.तसेच या स्पर्धेला आपण मोठा…
-
पाणीबाणी आणि पाणीपेरणी

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९०) जून महिना संपला तरी पुरेशा सरासरीने पाऊस सर्वत्र पडलेला दिसत नाही.महाराष्ट्रासह देशाच्या अनेक भागात गंभीर पाणीबाणी उद्भवली आहे.नाशिक पासून हैद्राबादपर्यंतची देशभरातील अनेक शहरे आणि ओडिशापासून उत्तरप्रदेश पर्यंतच्या अनेक राज्यांमध्ये गंभीर पाणी संकट उभे आहे.एकूण देशातीलच पाणीप्रश्न गंभीर बनला आहे.मुळात पाणी कमी कमी होत चाललंय आणि जे आहे ते पाणी…
-
लोकराजे राजर्षी शाहू महाराज

प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी (९८ ५० ८३ ०२ ९०) २६ जून २०१९ हा लोकराजे छत्रपती शाहूमहाराजांचा १४५ वा जन्मदिन.युगकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर आपल्या कार्याचा आणि विचारांचा ठसा पुढील अनेक पिढ्यांवर आजतागायत जे उमटवत राहिले आहेत त्यात लोकराजे शाहू महाराज यांचे नाव घ्यावे लागेल.सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेला अग्रक्रम देणारे ते जाणते राजे होते.’एक वेळ गादी सोडून देईन…
-
लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचे १५० वे जन्मवर्षं

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५० ८३ ० २ ९०) महाराष्ट्राच्या औद्योगिक घराण्यांपैकी एक आदरणीय नाव म्हणजे ‘किर्लोस्कर’.किर्लोस्कर उद्योगाचे संस्थापकत्व अर्थात जनकत्व जाते ते कालवश लक्ष्मणराव काशीनाथ किर्लोस्कर यांच्याकडे. २० जून १८६९ रोजी जन्मलेले लक्ष्मणराव वयाच्या ८७ व्या वर्षी २६ सप्टेंबर १९५६ रोजी कालवश झाले.त्यांचे हे १५० वे जन्मवर्षं आहे.शुन्यातून विश्व उभे करण्याचे उदाहरण त्यांनी…