वर्ष: वाय
-
राष्ट्रीय बोधचिन्हा पासून घ्यायचा बोध
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) नव्या संसद भवनावर राष्ट्रीय बोधचिन्ह असलेल्या भव्य अशोकचिन्हाचे सोमवार ता.११ जुलै २०२२रोजी पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झाले. ब्रांझ धातूचे हे बोधचिन्ह २१ फूट उंच असून साडे नऊ टन वजनाचे आहे. या बोधचिन्हाचा पाया म्हणून साडेसहा टनाचा एक चौथरा बसवलेला आहे. हे मानचिन्ह…
-
तीर्थ विठ्ठल – शेर विठ्ठल

नमस्कार ,आषाढीच्या मनःपूर्वक शुभेच्छा…. या निमित्ताने गेल्या सदतीस वर्षाच्या गझल लेखन प्रवासातील अनेक शेरांपैकी साठपेक्षा अधिक शेर…तीर्थ विठ्ठल – शेर विठ्ठल
-
आषाढी निमित्त विठ्ठल स्वगत

रविवार ता.१० जुलै २०२२ रोजी ‘ आषाढी एकादशी’ आहे आणि बकरी ईदही आहे.भारतीय लोकमानसातील, संस्कृतीतील एकतेतील विविधतेचा हा भक्कम पुरावा आहे.सांस्कृतिक राष्ट्रवाद ,जातींची उतरंड,धर्मांधता,प्रधारमद्वेष विठ्ठलालाही मान्य नाही.म्हणून तर तो अस्सल मानवधर्मी शिकवण देतो.आषाढी व कार्तिकी वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैशिष्ट्य व संचित आहे.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दोन वर्षे आषाढी ,कार्तिकी यात्रा होऊ शकलेली नव्हती. त्यामुळे यावर्षी वारीला…
-
लोकभ्रम नवे – जुने

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) अखेर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. सत्ताधारी आघाडीतील एका पक्षाचा एक मोठा गट विरोधकांबरोबर सत्ता स्थापावी ही भूमिका करत असलेले नऊ दिवस आणि नऊ रात्री चाललेले नवनाट्य अखेर संपले.या साऱ्या वर्तमानाची समीक्षा त्यातील पात्रेच कालांतराने स्वतःच करतील. राजकारण ही गोष्ट बाजूला ठेवली तरी…
-
उषाताई पत्की यांच्या पहिल्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) उषाताई यशवंतराव पत्की यांचा आज पहिला स्मृतिदिन. गतवर्षी वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी सोमवार ता. २८ जून २०२१ रोजी त्या कालवश झाल्या. अतिशय प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या उषाताई निवृत्त मुख्याध्यापिका होत्या. सांगली येथील राणी सरस्वतीदेवी कन्या शाळा या विमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत मराठी,भूगोल व हस्तकला या विषयांच्या विद्यार्थीप्रिय शिक्षिका होत्या.त्यांच्या…
-
अमृतमहोत्सवी शाहीर विजय जगताप
शुक्रवार ता. २४ जून २०२२ रोजी इचलकरंजीचे सुपुत्र महाराष्ट्रातील नामवंत शाहीर विजय जगताप यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सत्कार सोहळा संपन्न होत आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी राज्यपाल व विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते तसेच इतर मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न होत आहे. यानिमित्ताने शाहीर विजय जगताप यांच्याविषयी…
-
आगरकर : एक जिद्दी सुधारक
प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी ( ९८५०८ ३०२९०) एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात भारतातील एक अग्रगण्य समाजसुधारक म्हणून गोपाळ गणेश आगरकर यांच्याकडे पहावे लागेल.ते अनेक अर्थानी सुधारकाग्रणी होते.१४ जुलै १८५६ रोजी जन्मलेले आगरकर १७ जून १८९५ रोजी कालवश झाले.अवघे एकोणचाळीस वर्षाचे आयुष्य मिळालेल्या आगरकरांनी महाराष्ट्राच्या पर्यायाने भारताच्या विचारविश्वाच्या समृद्धीत मोठी भर घातलीआहे.’इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते…
-
संत कबीर : सहज समाधी भली
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) संत कबीर यांच्या विचारांची आज समाजाला नितांत गरज आहे. आजच्या बिघडलेल्या ( बिघडवलेल्या ) परिस्थितीत माणूस व माणुसकी दोन्हीही ढासळत चालली आहेत .त्यातून सावरण्यासाठी संत विचारांकडे डोळस भूमिकेतून पाहिले पाहिजे. ‘कबीर विचार ‘हा त्यातील एक महत्त्वाचा विचार आहे. मंगळवार ता. १४ जून रोजी कबीर जयंती आहे.त्यामुळे कबीर जयंतीचे…
-
भाई माधवराव बागल पुरस्काराच्या निमित्ताने..
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) सर्वप्रथम आज २८ मे २०२२ रोजी ‘ भाई माधवराव बागल ‘ यांच्या १२६ वा जन्मदिनी त्यांना विनम्र अभिवादन.आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार,भाई माधवराव बागल विद्यापीठाचे अध्यक्ष ऍड.अशोकराव साळोखे,कार्याध्यक्ष प्राचार्य डॉ.टी.एस.पाटील आणि सर्व संचालक,मंचावरील व मंचासमोरील सर्व मान्यवर,या समारंभासाठी आलेले समाजवादी प्रबोधिनीच्या कामातील माझे सर्व…
-
थोर समाजसेवक पद्मभूषण भाई माधवराव बागल
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) शनिवार ता.२८ मे २०२२ रोजी पद्मभूषण भाई माधवराव बागल यांचा १२६ वा जन्मदिन आहे. भाई माधवराव बागल विद्यापीठ, कोल्हापुर यांच्या वतीने ‘ भाई माधवराव बागल पुरस्कार २०२२ ‘ हा सन्माननीय पुरस्कार यादिवशी मला समारंभपूर्वक प्रदान केला जातो आहे. याचा मनस्वी आनंद आहे. तसेच या बरोबरच येणाऱ्या वाढत्या जबाबदारीचीही…