-
भूदान ते भूजप्ती : सत्तर वर्षातील बदल

१९५१ मध्ये तेलंगणात अनेक ठिकाणी हिंसाचार सुरू होता. तेथे शांततेचे आवाहन करण्यासाठी विनोबा गेले होते. जमीनदार आणि शेतमजूर यांच्यात पराकोटीचा संघर्ष असल्याचे त्यांना दिसले.त्यावेळी त्यांनी भूदानाबाबत आपले विचार मांडले.त्यावर प्रभावित होऊन १८ एप्रिल १९५१ रोजी रामचंद्र रेड्डी यांनी शंभर एकर जमीन या चळवळीला दान केली.त्यातून विनोबांनी भारतभर यात्रा सुरू केली.त्याला या महिन्यात सत्तर वर्षे पूर्ण…
-
लोकशाहीचा दुरुपयोग

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९० ) भारतीय स्वातंत्र्य यावर्षी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.भारताने बादशाही, पातशाही, राजेशाही यांच्या नंतर ब्रिटिश साम्राज्यशाहीशी मुकाबला करून लोकशाही राष्ट्र प्रस्थापित केले.भारतीय राज्यघटनेतील एक महत्त्वाचे मूल्य म्हणून लोकशाहीकडे आपण सारेजण पाहतो. जगातील सर्वाधिक मोठ्या लोकसंख्येची लोकशाही म्हणून भारताचा लौकिक राहिलेला आहे. मात्र गेल्या काही वर्षात भारतीय…
-
माणगाव परिषदेची एकशे एक वर्षे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) एकशे एक वर्षांपूर्वी म्हणजे २१ व २२ मार्च १९२० रोजी कोल्हापूर संस्थानातील माणगाव येथे अखिल महाराष्ट्र अस्पृश्य वर्गाची परिषद झाली. त्या परिषदेचे अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर होते .तर प्रमुख पाहुणे राजर्षी शाहू महाराज होते .वयाच्या तिशीमध्ये या परिषदेचे अध्यक्ष असलेल्या डॉ.आंबेडकर यांच्या पुढील व्यापक कार्याची ही परिषद…
-
मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती: कविवर्य सुरेश भट

‘माझा संबंध जगण्याशी आणि माणसांशी होता .माणूस आणि मानवी संबंध हीच माझी प्रेरणा आहे. जीवन तसे अपूर्णच असते. संपूर्णते साठी जखमा अपरिहार्य असतात. ज्या जीवनात जखमा नाहीत ते जीवनही समृद्ध नाही .कवितेचा संबंध आयुष्याची असतोच.’ असे म्हणणाऱ्या सुरेश भट यांचा रविवार ता.१४ मार्च २०२१ रोजी अठरावा स्मृतिदिन आहे.त्यानिमित्ताने…
-
१११ वा महिला दिन आणि १२४ वा सावित्रीबाई स्मृतीदिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) ८ मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो .तर १० मार्च हा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन असतो. जागतिक महिला दिनाचा आशय आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवन संदेश जाणून घेऊन, त्याचा आजच्या संदर्भात अन्वयार्थ लावून आपला वर्तन व्यवहार करणे ही सावित्रीच्या…
-
राष्ट्रीय विज्ञान दिनाचा संदेश

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) २८ फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो . नोबेल विजेते भारतीय शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही.रामन यांच्या सन्मानार्थ हा दिन साजरा केला जातो. विज्ञानाचा शब्दशः स्फोट म्हणता येईल अशा युगात आपण आज वावरत आहोत.अगदी पाच,दहा वर्षांपूर्वी आश्चर्यजनक वाटणाऱ्या बाबी आज आपल्या दैनंदिन जीवनाचा…
-
‘सावली अंबराची’ या गझलसंग्रहाची प्रस्तावना : गझलनंदाचा गझलानंदी प्रवास

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) मराठी गझलचा विस्तार गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय वेगाने होत आहे.या विस्तारामध्ये ज्यानी सकस व सात्विक भर घातली त्या गझलकारांमध्ये अग्रक्रमाने समावेश करावा लागेल त्यापैकी एक महत्वाचे नाव म्हणजे सुनंदा पाटील उर्फ गझलनंदा. मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेश भट उर्फ दादा यांनी ‘ विजा घेऊन येणाऱ्या पिढीतील ‘…
-
पानसरेंनी मांडलेले छत्रपती शिवराय

१९ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आणि २० फेब्रुवारी शहीद गोविंद पानसरे यांचा स्मृतीदिन आहे. शहीद पानसरे यांनी ” शिवाजी कोण होता ? “या पुस्तकाद्वारे शिवरायांबाबतचे अभ्यासपूर्ण लोकप्रबोधन केले आहे. यानिमित्ताने त्या पुस्तकाच्या आधारे लेख रूपाने शिवाजी महाराज समजून घेणे हे औचित्यपूर्ण ठरेल…
-
‘गझलनंदा ‘ यांच्या गझलेतील स्त्री उद्गार

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९० ) मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती आदरणीय सुरेश भट यांच्या जीवनदानी योगदानामुळे गेल्या अर्धशतकातमराठी गझलचा विस्तार अतिशय वेगाने होत आहे. सुरेश भटांनी उर्फ दादांनी गझलेची बाराखडी लिहून गझलेचे तंत्र आणि मंत्र सांगण्याचा पूर्णांशी प्रयत्न केला. गुरू – शिष्यत्वाचे कोणतेही अवडंबर न माजवता अथवा गंडाबंदत्वाचा कोणताही आग्रह न…
-
आंदोलनजीवी देशउभारे देशभक्त असतात देशविके नव्हे
भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात हजारोनी बलिदान दिले.लाखोंनी सहभाग घेतला.हालअपेष्टा भोगल्या.आणि भारताला स्वतंत्र केले. या साऱ्यांचा जीव स्वातंत्र्यात होता.कारण ते सच्चे देशभक्त होते. आंदोलन व आंदोलक हे साम्राज्यवाद विरोधी लढ्यापासून संसदीय लोकशाही व्यवस्थेपर्यन्त आदराचा विषय आहे. मात्र मा.पंतप्रधानांनी शेतकरी आंदोलनातील आंदोलकांची व त्यांच्या समर्थकांची सरसकट ‘आंदोलनजीवी ‘ अशी हेटाळणी करून समस्त आंदोलन कर्त्यांनाच अपमानीत दिले आहे हे…