कॅटेगरी: Uncategorized
-
आव्हानांच्या विळख्यातील लोकशाही

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) समकालीन आर्थिक,सामाजिक, राजकीय प्रश्नांचा उल्लेख न करता,आपण घेतलेल्या निर्णयांची इष्ट- अनिष्टता यांची चर्चा न करता,धादांत खोटेपणा,लबाडी,व्यक्तिद्वेष,समूहद्वेष यावर आधारित राजकारण होत आहे.आणि तिला संसदीय मार्गाने प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होतो आहे.भारतीय लोकशाही व्यवस्थेत होत असलेला हा बदल अतिशय चिंताजनक आहे.लोकशाहीची वाढ ही तिच्या अंगभूत सक्रीयतेतून होणे अपेक्षित असते.पण आज…
-
संहारक युध्दज्वर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) रशियाचे युक्रेन वरील आक्रमण अत्यंत जोरदार पद्धतीने गेले दहा दिवस सुरू आहे. रशियाच्या बॉम्बहल्ल्यामुळे युरोप मधील सर्वात मोठ्या अणुप्रकल्पाला आग लागली. अर्थात ती आटोक्यात आणली गेली. या प्रकल्पावर रशियाने ताबा मिळवला आहे. युक्रेनच्या दक्षिणेकडील खेरसन हे पहिले मोठे शहर रशियाने ताब्यात घेतले आहे. तसेच युक्रेन व रशिया यांच्या…
-
वस्त्रनगरी : श्रमसंस्कृतीचे शहर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९०) दैनिक सकाळच्या इचलकरंजी कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त ‘ संस्कृती ‘ही पुरवणी शनिवार ता. ५ मार्च २०२२ रोजी प्रकाशित झाली त्यातील लेख —–—————— प्रत्येक शहराला एक संस्कृती असते.अर्थातच ती एकूण व्यापक भारतीय संस्कृतीचाच एक घटक असते. अनेकदा ही संस्कृती विविधतेच्या मिश्रणातून तयार होत असते. दै. सकाळ च्या वतीने आज…
-
थोर समाजसेवक भाई माधवराव बागल

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) थोर समाज सेवक पद्मभूषण भाई माधवराव बागल यांचा ६ मार्च हा स्मृतिदिन.२८ मे १८९५ रोजी जन्मलेले भाई माधवराव बागल ६ मार्च १९८६ रोजी वयाच्या एक्याणव्या वर्षी कालवश झाले.कोल्हापूरच्या इतिहासमध्ये विसाव्या शतकातील एक प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून भाई माधवराव बागल यांच्याकडे पाहावे लागते. कोल्हापूर आणि परिसराच्या विकासासाठी त्यांनी आपले आयुष्य…
-
राष्ट्रीय विज्ञान दिनाचा अन्वयार्थ

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) २८ फेब्रुवारी हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो . नोबेल विजेते भारतीय शास्त्रज्ञ डॉ.सी.व्ही.रामन यांच्या सन्मानार्थ हा दिन साजरा केला जातो. विज्ञानाचा शब्दशः स्फोट म्हणता येईल अशा युगात आपण आज वावरत आहोत.अगदी पाच,दहा वर्षांपूर्वी आश्चर्यजनक वाटणाऱ्या बाबी आज आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग…
-
मराठी अभिजात भाषा आहेच

प्रसाद माधव कुलकर्णी (९८ ५०८ ३० २९०)५३६/१८,इंडस्ट्रियल इस्टेटसमाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीता.हातकणंगलेे जि .कोल्हापूरपिन -४१६ ११५ ( महाराष्ट्र) २७ फेब्रुवारी हा दिवस प्रतिभावंत कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन असतो.हा दिवस ‘ मराठी राजभाषा दिन ‘ म्हणून साजरा केला जातो.मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी गेले दशकभर सुरू आहे. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतच्या प्रश्नाला उत्तर देतांन केंद्रीय…
-
पानसरेंनी मांडलेले छत्रपती शिवराय
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) शिवाजी कोण होता ? हे पुस्तक१९८८ साली शहीद गोविंद पानसरे यांनी लिहिले.ते इचलकरंजीच्या समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने प्रकाशित झाले होते.त्यानंतर त्या पुस्तकात वेळोवेळी अभ्यासाअंती भर घालत पानसरे यांनी ते अधिक परिपूर्ण केले. नंतर अन्य प्रकाशनसंस्थांनी ते प्रकाशित केले.गेल्या चौतीस वर्षात त्याच्या अनेक आवृत्त्या व लाखो प्रती लोकांपर्यंत पोहोचल्या.…
-
” गझल प्रेमऋतूची ” : मराठी गझलेतील महत्वाचा संग्रह
‘ गझल प्रेमऋतूची ‘ या संग्रहाला करवीर साहित्य परिषद, कोल्हापूरचा सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रहाचा ‘प्रथम ‘ पुरस्कार जाहीर झाला.या निमित्ताने आणि व्हॅलेन्टाईन डे अर्थात प्रेमदिवसाच्या पार्श्वभूमीवर या संग्रहाचा संक्षिप्त परिचय…
-
कॅप्टन रामभाऊ श्रीपती लाड : तुफानी स्वातंत्र्य सेनानी
ज्यांच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक व्हावे आणि आणि ज्यांच्या धगधगत्या मशालीतून समकालीन परिवर्तनाच्या चळवळीसाठी काही प्रेरक ठिणग्या घ्याव्यात अशी माणसे फार कमी आहेत. म्हणूनच कॅप्टन रामभाऊंचे प्रेरणादायी शतकीय अस्तित्व अतिशय महत्त्वाचे होते. वयाच्या शंभराव्या वर्षी शनिवार ता. ०५ फेब्रुवारी २०२२ रोजी हा तुफानी स्वातंत्र सेनानी कालवश झाला…
-
पंचवीस वर्षापूर्वीचे प्रबोधन -फेब्रुवारी १९९७
वाचकांचा पत्रव्यवहार : लोकजागृतीचे एक माध्यम प्रबोधन प्रकाशन माला वर्ष आठवे- अंक दुसरा अर्थात फेब्रुवारी १९९७ मध्ये प्रसाद कुलकर्णी यांनी लिहिलेली ‘ वाचकांचा पत्रव्यवहार : लोकजागृतीचे एक माध्यम ‘ ही ६८ पृष्ठांची पुस्तिका समाजवादी प्रबोधिनी, इचलकरंजीच्या वतीने प्रकाशित केली होती. वाचकांचा पत्रव्यवहार हे प्रत्येक वृत्तपत्रातील एक महत्त्वाचे वाचनीय सदर असते. जागृत, वाचक, नागरिक ,कार्यकर्ते यांना…