कॅटेगरी: Uncategorized
-
डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम व वाचन प्रेरणा दिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) भारताचे माजी राष्ट्रपती,महान शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा शुक्रवार ता. १५ ऑक्टोबर २०२१ रोजी नव्वदावा जन्मदिन आहे. डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन ‘ वाचन प्रेरणा दिन ‘म्हणून साजरा केला जातो. नव्या पिढीमध्ये व खासकरून विद्यार्थी वर्गामध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांच्यातून वाचनातूनच घडलेल्या डॉ.…
-
ते सहा तास ‘ मार्गावर येण्यासाठी उपयुक्त ठरोत

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० ) सोमवार ता. ४ ऑक्टोबर २०२१रात्री साडेनऊनंतर अचानक जगभरचे फेसबुक, व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम बंद पडले.ते सहा तासांनी सुरू झाले.पण ते सहा तास जगभर एकच हाहाकार माजला. जगातील एक आघाडीचे सोशल नेटवर्किंग संकेत स्थळ काही तास बंद झाले तर काय होऊ शकते याचे दर्शन या काळात झाले. यांत्रिक…
-
डॉ.तारा भवाळकर : लोकसंस्कृतीच माहेरघर

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८५०८ ३०२९०) डॉ.तारा भवाळकर हे नाव गेले जवळजवळ अर्धशतक मराठी साहित्य, लोकसाहित्य, लोकसंस्कृती,नाटक अशा विविध क्षेत्रात सुपरिचित आहे.त्यांना नुकताच “पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्यसेवा जीवनगौरव पुरस्कार ” जाहीर झाला आहे.रुपये एक लाख आणि स्मृतिचिन्ह असे स्वरुप असलेला हा पुरस्कार मराठी साहित्य – संस्कृती क्षेत्रामध्ये अतिशय मानाचा मानला जातो. हा पुरस्कार…
-
शहीद डॉ.दाभोळकर विनम्र अभिवादन

शहीद डॉ.नरेंद्र दाभोळकर,अंनिसच्या स्थापनेच्या जुळवाजुळवी पासूनचा आपला स्नेह अखेरपर्यंत वाढताच होता.तुम्ही सर्वांची साथ घेत चळवळ उभी केलीत.आज आठ वर्षे झाली तुमचा खून होऊन.त्यानंतर अवघ्या पंधरा दिवसात मी ‘ सनातनी विकृती आणि विवेकी संस्कृती ‘ हे पुस्तक लिहिलं व ते प्रकाशितही झालं.ऍड.गोविंद पानसरे यांनी त्याला प्रस्तावना लिहिली होती.आम्ही दोघांनी मिळून या विषयावर अनेक लोकजागरण सभा घेतल्या.…
-
सर्वोच्च न्यायालयाचे अभिनंदन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८५०८ ३०२९०) मा.पंतप्रधानांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण धोरणामध्ये बदल करत अठरा वर्षावरील सर्व भारतीय नागरिकांचे मोफत लसीकरण केंद्र सरकारच्या वतीने करण्याचे घोषणा केली. वास्तविक ही मागणी देशातील अनेक मुख्यमंत्र्यांनी आणि विरोधीपक्ष नेत्यांनी जाहीरपणे व समाज माध्यमातून यापूर्वीच केली होती.पण नेहमीप्रमाणे ती दुर्लक्षित करण्यात आली होती.पण सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड,न्यायमूर्ती एल.नागेश्वारराव ,न्यायमूर्ती…
-
सुंदरलाल बहुगुणा : एक काळीजकोरी आठवण

जागतिक कीर्तीचे थोर पर्यावरणरक्षक , चिपको आंदोलनाचे प्रणेते पद्मविभूषण डॉ. सुंदरलाल बहुगुणा यांचे कोरोनामुळे हृषीकेश येथील एम्स हॉस्पिटलमध्ये वयाच्या ९४ व्या वर्षी शुक्रवार ता.२१ मे २०२१ रोजी निधन झाले. हिमालयाचा रक्षक असलेला एक थोर गांधीवादी आपण गमावला आहे.एकतीस वर्षापूर्वी म्हणजे मार्च १९९० मध्ये आम्ही शिवाजी विद्यापीठाचे ‘ बॅचलर ऑफ जर्नलिझल अँड कम्युनिकेशन सायन्स ‘ चे…
-
कार्ल मार्क्स यांचा २०३वा जन्मदिन

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८ ५०८ ३० २९०) बुधवार ता. ५ मे २०२१ रोजी जगप्रसिद्ध विचारवंत कार्ल मार्क्स यांचा २०३ वा जन्मदिन आहे. आज जगभर भांडवलशाही अर्थव्यवस्थेतने प्रस्थापित केलेले विषमतेचे मॉडेल आणि आणि गेल्या सव्वा – दीड वर्षात कोरोना रुपी जागतिक संकटाने भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या दाखवून दिलेल्या मर्यादा व तिचे हिडीस स्वरूप पाहायला मिळते आहे .…
-
‘सावली अंबराची’ या गझलसंग्रहाची प्रस्तावना : गझलनंदाचा गझलानंदी प्रवास

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८ ५०८ ३० २९०) मराठी गझलचा विस्तार गेल्या काही वर्षांमध्ये अतिशय वेगाने होत आहे.या विस्तारामध्ये ज्यानी सकस व सात्विक भर घातली त्या गझलकारांमध्ये अग्रक्रमाने समावेश करावा लागेल त्यापैकी एक महत्वाचे नाव म्हणजे सुनंदा पाटील उर्फ गझलनंदा. मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेश भट उर्फ दादा यांनी ‘ विजा घेऊन येणाऱ्या पिढीतील ‘…
-
आंदोलनजीवी देशउभारे देशभक्त असतात देशविके नव्हे
भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात हजारोनी बलिदान दिले.लाखोंनी सहभाग घेतला.हालअपेष्टा भोगल्या.आणि भारताला स्वतंत्र केले. या साऱ्यांचा जीव स्वातंत्र्यात होता.कारण ते सच्चे देशभक्त होते. आंदोलन व आंदोलक हे साम्राज्यवाद विरोधी लढ्यापासून संसदीय लोकशाही व्यवस्थेपर्यन्त आदराचा विषय आहे. मात्र मा.पंतप्रधानांनी शेतकरी आंदोलनातील आंदोलकांची व त्यांच्या समर्थकांची सरसकट ‘आंदोलनजीवी ‘ अशी हेटाळणी करून समस्त आंदोलन कर्त्यांनाच अपमानीत दिले आहे हे…
-
मराठी गझलेतील अस्सल शेर : इलाही जमादार

इलाही जमादार हे कालवश सुरेश भट यांच्यानंतर व्यापक लोकप्रियता व रसिकप्रियता आपल्या कसदार लेखणीने मिळवणारे वर्तमान मराठी गझलेतील एक मान्यवर गझलकार होते. यांच्या निधनाने विद्यमान मराठी गझलेने एक ‘शेर ‘ गमावला आहे.फार मोठा गझलकार आणि अतिशय उत्तम माणूस गेला आहे.त्यांच्याविषयी थोडेसे…