-
शिक्षण क्षेत्र : गती की अधोगती

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co शिक्षण व्यवस्थेतील गैरप्रकाराच्या आणि खास करून नीट परीक्षेतील गैरव्यवहाराच्या विरोधामध्ये गेले महिनाभर नवी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. २० जुलै रोजी हजारोच्या संख्येने तरुण एकत्र आले आणि त्यांनी संसदेवर मोर्चा काढला. या मोर्चावर सुरक्षा जवानांनी ज्या पद्धतीने लाठीमार केला व अश्रुधुराचा मारा केला ते अतिशय निषेधार्ह आहे.…
-
शिकणारे शाळेत,शिकविणारे बाहेर , अर्थात शिक्षण बंद ?

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co महाराष्ट्रातील खाजगी व विनाअनुदानित तसेच अल्पसंख्यांक शाळेमधील शिक्षकांना जनगणनेच्या कामाची सक्ती करण्यात आली होती. त्या विरोधात अनएडेड स्कूल फोरम आणि इतरांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांनी राज्यघटनेतील तरतुदीनुसार या शिक्षकांना जनगणना किंवा अन्य कामांची सक्ती करण्याचे अधिकार शासकीय यंत्रणेला नसल्याचा युक्तिवाद केला होता. त्यावर…
-
एन. डी. सरांच्या ९७ व्या जन्मदिना निमित्ताने…

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी(९८५०८ ३०२९० )prasad.kulkarni65@gmail.co बुधवार ता.१५ जुलै २०२६ रोजी कालवश प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचा ९७ वा जन्मदिन आहे. १५ जुलै १९२९ रोजी जन्मलेले एन . डी.सर १७ जानेवारी २०२२ रोजी काळावर आपली अमीट मुद्रा उमटवून कालवश झाले.समाजवादी प्रबोधिनीचे संस्थापक सदस्य आणि विद्यमान अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत , शिक्षणतज्ज्ञ,महाराष्ट्रातील सर्व पुरोगामी – प्रबोधन…
-
पंचगंगा प्रदूषण मुक्तीचा प्रश्न

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co ” कोल्हापूर मधील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दररोज निर्माण होणाऱ्या २१४.१९ दशलक्ष लिटर घरगुती सांडपाण्यांपैकी ६९.४९ दशलक्ष लिटर सांडपाणी कोणत्याही प्रक्रियेविना पंचगंगा नदी पात्रात सोडले जाते “अशी माहिती पर्यावरण व हवामानबदल मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेमध्ये ८ जुलै २०२६ रोजी लेखी उत्तरात दिलेली आहे. काँग्रेसचे नेते…
-
कॅगचा महाराष्ट्राला नवा इशारा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co भारताचे नियंत्रक आणि लेखापरीक्षक (कॅग ) ही भारतीय राज्यघटनेच्या १४८ व्या कलमानुसार स्थापन झालेली एक घटनात्मक संस्था आहे.सरकारी तिजोरीतून होणाऱ्या जमाखर्चाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेची तपासणी कॅग करत असते. लेखापरीक्षण करून त्याची माहिती जनतेसमोर मांडत असते.कॅग आपला केंद्र सरकार विषयक अहवाल राष्ट्रपतींना आणि राज्य सरकार विषयक…
-
इचलकरंजी भूषण वसंतराव दत्तवाडे

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co दैनिक महासत्ताचे संपादक मा. वसंतरावजी दत्तवाडे शनिवार ता.११ जुलै २०२६ रोजी पहाटे कालवश झाले. ११ मार्च १९४८ रोजी जन्मलेल्या वसंतरावांनी गेली साडेचार -पाच दशके वृत्तपत्रसृष्टीत पत्रकार ,संपादक व मालक या नात्याने अतिशय बहुमोल कार्य केले. दोन वर्षांपूर्वी त्यांना श्रमिक पत्रकार संघटनेच्या वतीने ‘इचलकरंजी भूषण ‘ हा…
-
विजया मेहता : एक नाट्य घराणं

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी( ९८ ५०८ ३० २९० )Prasad.kulkarni65@gmail.com ‘ बाई ‘ या नावामध्ये जो आदरयुक्त दरारा होता तो राजकारणात इंदिराजींना प्राप्त झाला होता .आणि नाट्यक्षेत्रामध्ये विजया मेहता उर्फ बाई यांना. दोघींच्या कार्यकर्तृत्वसिद्धीचा तो कालखंडही थोडाफार समांतर होता. आधुनिक मराठी रंगभूमी आणि समांतर सिनेमात मोठे योगदान देणाऱ्या विजया मेहता यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९३४ रोजी…
-
संतर्पण: प्राचीन वाङ्मयाची ओळख

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी ( ९८ ५०८ ३० २९० ) Prasad.kulkarni65@gmail.com (पूर्वप्रसिद्धी : दैनिक मँचेस्टर…१ नोव्हेंबर १९८७) प्रा. डॉ. स.ग.मालशे यांनी गेल्या तीस वर्षाच्या कालावधीत अनेक प्रकारचे लेखन केलेले आहे. त्या लेखनामधील प्राचीन वाङ्मयासंबंधीच्या निवडक नऊ लेखांचे हे पुस्तक आहे.१९५५ ते १९८२ या काळात पूर्व प्रकाशित झालेले हे लेख आहेत.आपल्या लेखनासंबंधी डॉ.मालशे म्हणतात की, प्राध्यापक…
-
प्रणय व रूपक काव्यप्रकारांची ओळख

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (पूर्व प्रसिद्धी :दैनिक मँचेस्टर..२७ सप्टेंबर१९८७) प्राचीन मराठीतील प्रणयाख्याने व रूपकाख्याने हे जालना येथील मराठी विषयाचे प्रा. डॉ. शिवाजी गडळकर यांनी लिहिलेले पुस्तक आहे. या पुस्तकात विषयाचे अतिशय स्पष्ट, सखोल व विचारपूर्वक विवेचन करण्यात गडळकर यशस्वी झाले आहेत असे मानण्यास हरकत नाही. प्राचीन मराठीतील या साहित्य प्रकारांचा…
-
लोकसाहित्याचा उगम असणारी भावगंगा

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी (९८५०८ ३०२९० ) prasad.kulkarni65@gmail.co (पूर्व प्रसिद्धी :दैनिक मँचेस्टर.. २३ ऑगस्ट १९८७) मराठी भाषेमधील लोकवांग्मय किंवा लोकसाहित्य यांचा परिश्रमपूर्वक अभ्यास करून डॉ. ताराबाई परांजपे यांनी ‘ सीमा प्रदेशातील भावगंगा ‘या पुस्तकाची मांडणी केल्याचे दिसून येते.या पुस्तकात प्रामुख्याने मराठवाडा आणि तेलंगणा या भागातील लोकगीतांचा, ओव्यांचा समावेश आहे. या ओव्यातून तत्कालीन बोलीभाषा, संस्कृती, आणि…