प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co
उजाले अपने यादों के हमारे साथ रहने दो
न जाने किस गली मे जिंदगी की शाम हो जाये….
हा शेर वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी लिहिणारे महान शायर बशीर बद्र आज गुरुवार दि.२८ मे २०२६ रोजी सकाळी ११ च्या दरम्यान भोपाळ येथे कालवश झाले. आज बकरी ईद आहे. बलिदानाची अथवा कुर्बानीची सर्वोच्च किंमत देऊन निष्ठेची आठवण करून देणारा सण आहे. त्याच दिवशी बशीरसाहेब आपली साथ सोडून निघून गेले.
एक दिन तुझसे मिलने जरूर आऊंगा
जिंदगी मुझको तेरा पता चाहिये…
असा जीवनाचा शोध घेणारा शेर लिहिणाऱ्या बशीर बद्र साहेबाना उर्दू साहित्यामध्ये आधुनिक गझलांचे गुरु मानले जात होते.उर्दू गझलेमध्ये काही प्रमाणात फारसी,अरबी भाषेच्या वापरामुळे जे जडत्व आले होते, काहीशी दुर्बोधता आली होती त्यातून त्यांनी उर्दू गझल बाहेर काढली. ती सर्वसामान्य माणसात रुजवली.शब्दशः लाखो रसिक बशीर बद्र यांच्या लेखनावर प्रेम करत करतात. जगभरातील अनेक देशांमध्ये त्यांनी आपल्या रचना सादर केलेल्या होत्या.
त्यांचे शेर इंदिरा गांधी यांच्यापासून अनेक राजकारण्यांनी आपल्या भाषणातून वापरले,अनेक विचारवंतांनी आपल्या मांडणीत व लेखनात वापरले. मुशायऱ्यांचे सूत्रसंचालक तर बशीर बद्र यांच्या शेरांशिवाय मैफलच सजवू शकत नाहीत हे वास्तव आहे. सर्वसामान्य माणसाच्या ओठांओठांवर त्यांचे शेर आहेत यातच त्यांची महानता दिसून येते. अठरा वीस वर्षापूर्वी मी उ !?(:!!र्दू हिंदी गझलकारांची गझलेसह ओळख हे सदर लिहित होतो. त्यावेळी मी बशीर बद्र यांचा थोडक्यात परिचय आणि गझलेचा भावार्थ लिहिला होता. बशीर बद्र यांचे लेखन मिळवून वाचण्याचा आणि त्यातून बरेच काही शिकण्याचा अनुभव माझ्यासह हजारो गझल प्रेमींनी वर्षानुवर्षे घेतलेला आहे.
१५ फेब्रुवारी १९३५ रोजी अयोध्येत त्यांचा जन्म झाला. बशीर बद्र यांचे मूळ नाव सय्यद मोहम्मद बद्र असे होते. वयाच्या सातव्या वर्षापासून बशीर शेरोशायरी करत होते.पंधरा-सोळा वर्षाचे असताना त्यांचे पितृछत्र हरपले त्यामुळे त्यांना पोलिसात काही काळ नोकरी करावी लागली. हे करत असतानाच त्यांनी अलिगढ मुस्लिम विद्यापीठातून बीए, एमए आणि त्यानंतर उर्दू साहित्यातील पीएच.डी. पदवीही प्राप्त केली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी याच विद्यापीठात प्राध्यापक म्हणूनही अनेक वर्षे काम केले. पुढे ते मेरठ कॉलेजमध्ये उर्दू विभागाचे प्रमुख म्हणून रुजू झाले आणि सुमारे सतरा वर्षे तिथे कार्यरत होते. ते एम.ए.करत असताना त्यांच्याच काही रचना त्यांच्या अभ्यासक्रमात होत्या असे म्हटले जाते. अर्थात अतिशय लहान वयापासून बशीर बद्र यांनी अस्सल लेखनावर जी हुकमत मिळवलेली होती त्यामुळे यात शंका घेण्यासारखे काही नाही.
त्यांच्या पत्नी डॉ.राहत बद्र या लेखिका व शिक्षिका.बशीर बद्र गेली अनेक वर्षे विस्मरणाच्या रोगाने त्रस्त होते. डॉ.राहत यांनी बशीर बद्र यांची अखेरच्या काळात जी देखभाल केली त्याला खरंच तोड नाही.
अगर तलाश करू कोई मिल ही जायेगा
मगर तुम्हारी तरह कौन मुझको चाहेगा…
हा शेर बशीर बद्र साहेबांनी लिहिला तो राहत यांनाच उद्देशून असावा असे वाटते.
स्मृतीभ्रंशातून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांच्या पत्नी डॉ.राहत बशीर यांचे शेर गुणगुणत असत, ते ऐकून काहीवेळा बशीर साहेब हलकेसे स्मित करत असत. आणि कधी कधी चक्क अर्धी राहिलेली ओळ किंवा तो शेर पूर्णही करत असत. इतके आपल्या लेखनाशी तादात्म्य पावलेले ते शायर होते. जगाचे विस्मरण होत असताना स्वतःच्या अक्षर रचनांचे स्मरण होणे यापेक्षा कोणत्याही कवीचे कवितेवर प्रेम असू शकत नाही.बशीर बद्र यांचे असे निस्सिम प्रेम होते.
मेरठ मध्ये १९८७ मोठी जातीय दंगल झाली . या दंगलीत दंगलखोरांनी त्यांचे मेरठमधील घर लुटून ते पेटवून दिले. या आगीत त्यांच्या आयुष्याची मिळकत, पदव्या, पुस्तके, पूर्ण -अपूर्ण लेखन, अनिल हस्तलिखिते जळून खाक झाली. याचा मोठा आघात बशीर यांच्यावर झाला. यावेळी त्यांना प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी मोठी साथ दिली. विशाल भारद्वाज अनेकदा डॉ .बशीर साहेबांच्या घरी जात असत. डॉ.बशीर साहेबांनी ऐकवलेल्या अनेक कविता आणि गझला भारद्वाज यांना तोंडपाठ होत्या. त्यांनी जवळपास नव्वद टक्के गझला पुन्हा लिहून काढल्या. त्यातून बशीर साहेब पुन्हा उभे राहिले.
लोग टूट जाते है एक घर बनाने में
तुम तरस नही खाते बस्तीया जलाने मे…
असा जातीय दंगलीवर शेर लिहिणाऱ्या बशीर बद्र
साहेबांनी जीवनाच्या हरेक पैलूवर लिहिले. शब्दांवरील हुकमत आणि विचारांची प्रगल्भता
तसेच सहजता आणि सोपेपणा ही त्यांच्या शायरीची वैशिष्ट्ये आहेत.
मेरठ नंतर बशीर साहेब भोपाळला स्थायिक झाले.मेरठच्या त्या मोठ्या धक्क्यातून भोपाळच्या भवतालात बशीर साहेब पुन्हा उभे राहिले. तिथेच त्यांची भेट डॉ. राहत यांच्याशी झाली. त्यांचा विवाह झाला.डॉ. राहत यांनी बशीर साहेबांना त्या मानसिक धक्क्यातून बाहेर काढले होते. २०२० साली नुसरत हा त्यांचा मुलगा कालवश झाला होता.
डॉ.बशीर बद्र यांना साहित्यातील अनमोल योगदानासाठी १९९९ मध्ये केंद्र सरकारने पद्मश्री या नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. त्याच वर्षी त्यांच्या ‘आस’ या प्रसिद्ध काव्यसंग्रहासाठी त्यांना ‘साहित्य अकादमी पुरस्कार’ मिळाला. काही वर्षापूर्वी दुबईच्या बज्म ए उर्दू या शिखर साहित्यसंस्थेकडून त्यांना जोश ते उर्दू हा किताब भोपाळ मध्ये घरी जाऊन प्रदान करण्यात आलेला होता.याशिवाय ‘इमकान,आहटें, कुल्लियात-ए-बशीर बद्र,उजाले अपनी यादों के, फुलो की छतरिया आदी अनेक पुस्तके प्रचंड लोकप्रिय ठरली.बशीर साहेबांची एक गझल पुढीलप्रमाणे,
तलवार से काटा है फुलो भरी डाली को
दुनिया मे नही चाहा हम चाहनेवालोंको…
( प्रेमाच्या इच्छाआकांक्षा यांनी फुललेल्या आमच्या फांद्या तलवारीने छाटल्या जात आहेत. प्रेम करणाऱ्यांवर या जगाचा राग नेहमीच असा का ?)
मैं आग था,फुलोमे तबदीलहुआ कैसे
बच्चों की तरह चुमा उसने मेरे गालो को….
( मी तर आग होतो.पण या आगीच फुलात रूपांतर कसं झालं? तिनं तर अगदी लहान मुल समजून माझ्या गालाची चुंबन घेतले.)
बरसात का मौसम तो लहराने का मौसम है
उडने दो हवाओमे बिखरे हुए बालो को…
( पावसाळ्यात थोडी थंड हवा, गार वारा असणारच तुझ्या उडणाऱ्या बटांना उडू दे की, कशाला सावरतेस )
अखलाख,वफा, चाहत सब कीमती कपडे है
हर रोज न ओढा कर इन रेशमी शालों को..
(चारित्र्य,नीती, विश्वास, प्रेम हे सगळे फार किमती पोशाख आहेत. त्यांना दररोज परिधान करण्यात काहीही अर्थ नाही..)
बशीर बद्र यांचे काही अप्रतिम शेर पुढीलप्रमाणे..
मेरी हसी से उदासी के फूल खिलते है
मै सबके साथ हु लेकिन जुदासा लगता हू…
दुश्मनी जमकर करो लेकिन ये गुंजाइश रहे
जब कभी हम दोस्त हो जाये तो शर्मिंदा न हो…
जिस दिन से चला हु मेरी मंजिल पर नजर है
आंखों ने कभी मिल का पत्थर नही देखा….
बडे लोगों से मिलने मे हमेशा फासला रखना
दरिया जहा समंदर से मिला, दरिया नही रहता..
शोहरत की बुलंदी भी पलभर का तमाशा
है जिस डाल पर बैठे है वो टूट भी सकती है…
तू अजब चीज हो, सौ बार तुम्हे देखा है
फिर भी हर बार नया देखना अच्छा लगा…
यहाँ लिबास की क़ीमत है आदमी की नहीं
मुझे गिलास बड़े दे शराब कम कर दे…
मोहब्बतों में दिखावे की दोस्ती न मिला
अगर गले नहीं मिलता तो हाथ भी न मिला..
सर झुकाओगे तो पत्थर देवता हो जाएगा
इतना मत चाहो उसे वो बेवफ़ा हो जाएगा…
घरों पे नाम थे नामों के साथ ओहदे थे
बहुत तलाश किया कोई आदमी न मिला…
इसी शहर में कई साल से मिरे कुछ क़रीबी अज़ीज़ हैं
उन्हें मेरी कोई ख़बर नहीं मुझे उन का कोई पता नहीं…
अजीब शख़्स है नाराज़ हो के हँसता है
मैं चाहता हूँ ख़फ़ा हो तो वो ख़फ़ा ही लगे..
जी बहुत चाहता है सच बोलें
क्या करें हौसला नहीं होता…
आँखों में रहा दिल में उतर कर नहीं देखा
कश्ती के मुसाफ़िर ने समुंदर नहीं देखा…
खुद को इतना भी मत बचाया कर
बारिश हो तो भीग जाया कर…
मुसाफिर है हम भी मुसाफिर हो तुम भी
किसी मोड पर फिर मुलाकात होगी….
कभी कभी तो छलक पडती है युही आखे
उदास होने का कोई सबब नही होता…
जिंदगी तूने मुझे कब्र से कम दी है जमी
पांव फैलाऊ तो दिवार में सर लगता है…
असे शेकडो शेर लिहिणाऱ्या पद्मश्री डॉ. बशीर बद्र यांना विनम्र अभिवादन…!
——+-+++++++++++++++++

यावर आपले मत नोंदवा