प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८५०८ ३०२९० )
prasad.kulkarni65@gmail.co
या आठवड्यात दोन तीन बातम्या वाचण्यात आल्या. त्यातील पहिली लंडन इथून आलेली होती. वैज्ञानिक संशोधकांचा आधार देऊन या बातमीत म्हटलेलं होतं, झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर करणे हानिकारक आहे. अंथरुणात पडून सोशल मीडिया पहाणे ,स्क्रोल करणे, वेब सिरीज पाहणे ,ईमेल पाहणे, रील्स पाहणे ही अनेकांची सवय झाली आहे .काही जणांना तो विरंगुळा व आरामही वाटतो.पण ही सवय शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहे. कारण शास्त्रज्ञांच्या मते स्क्रीनमधून निघणारा निळा प्रकाश आपल्या शरीराच्या नैसर्गिक जैविक घड्याळावर परिणाम करतो. त्यामुळे झोप आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. हा निळा प्रकाश आपल्या मेंदूला असे सांगतो की, अजूनही दिवस सुरू आहे. त्यामुळे झोपेसाठी आवश्यक असलेल्या मेलाटोनिन या हार्मोनची निर्मिती कमी होते. मेलाटोनिन हे हार्मोन शरीराला झोपेसाठी तयार करत असते. जेव्हा त्याची पातळी कमी होते तेव्हा आपल्याला झोप लागण्यात अडथळा येत असतो. रात्री उशिरापर्यंत स्क्रीन पाहिल्याने केवळ झोप कमी होते असे नाही तर झोपेची गुणवत्ताही कमी होत असते. आपला मेंदू पूर्णपणे शांत होऊ शकत नाही. त्याचा परिणाम थकवा, आळस ,चिडचिडेपणा, कामाची उत्पादकता कमी होणे, डोळ्यांवर प्रचंड ताण येणे यात होतो. तसेच स्क्रीन भरून सतत मिळणारी माहिती आणि सोशल मीडियावरील इतरांच्या आयुष्याशी होणारी तुलना यामुळे मेंदूवर ताण होतो परिणामी चिंता आणि मानसिक अस्वस्थता वाढते.
दुसरी बातमी आहे ती म्हणजे मोबाईल अथवा संगणकावर गेम खेळणाऱ्यांची. या बातमीनुसार २०२४ या वर्षांमध्ये भारतातील ८४,२६२ व्यक्तींची ऑनलाइन गेमिंग खात्यांची माहिती लीक झाली आहे. तर जगभरातील एक कोटी दहा लाख खात्यांची माहिती लीक झाली आहे. जागतिक सायबर सुरक्षा कंपनी कॅस्पेरस्कीचा अहवाल देत लोकमतने ही बातमी दिलेली आहे.
तिसरी बातमी अशी आहे, ट्रेंड्स च्या मागे धावण्याच्या स्पर्धेत अनेक क्रिएटर्स त्यांची खरी ओळख व मौलिकता गमावत चालले आहेत. त्यामुळे लाखो फॉलॉवर्स व हजारो व्हायरल व्हिडिओ असतानाही आता मोठ्या संख्येने कंटेंट क्रिएशन या व्यवसायातून बाहेर पडत आहेत. २०२४ पासून आतापर्यंत दोन लाखाहून जास्त क्रिएटर्स डिजिटल स्पेसच्या बाहेर पडले आहेत. कारण हा व्यवसाय त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करत आहे. मानसिक थकवा व मानसिक ओझे यांचा ही मंडळी मोठ्या प्रमाणावर सामना करत आहेत.
महाराष्ट्रामध्ये गेले तीन वर्ष ३२ लाख १४ हजार रुग्णांना मानसिक आरोग्याबाबत उपचार घ्यावे लागले आहेत असे अलीकडेच एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. मानसिक आजारी असणाऱ्यांचे हे वाढते प्रमाण धक्कादायक आहे. मानसिक स्वास्थ्य बिघडण्यासाठी कामाचा व इतर गोष्टींचा ताणतणाव ,व्यसनाधीनता ,बदललेली जीवनशैली ही कारणे तर आहेतच. मात्र मुख्य कारण हे मोबाईलचा अतिवापर हेच स्पष्ट होऊ लागले आहे. नोमोफोबिया हा नवा आजार बळावत चाललेला आहे. सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या अतिवापरामुळे मोबाईलचे व्यसन लागते या मोबाईलच्या व्यसनाला नोमोफोबिया म्हणतात. या आजारात सतत फोन पाहण्याची, फोन नसेल तर अस्वस्थ होण्याची, चिडचिडे होण्याची लक्षणे असतात. या रोगामुळे निद्रानाशापासून डिप्रेशनपर्यंत आणि काम कमी असले तरीही दमल्यासारखे वाटण्यापासून आणि मानसिक विकृती वाढण्यापर्यंत अनेक विकार उद्भवत आहेत. परिणामी त्यातून कौटुंबिक ताण-तणावही मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.
मोबाईलच्या अप्रत्यक्षपणे लागलेल्या पण प्रत्यक्षपणे कार्यरत असलेल्या गंभीर व्यसनामुळे होणारी हानी टाळायची असेल तर मानसोपचार तज्ञ ‘डिजिटल डिक्टॉस ‘हा उत्तम पर्याय असल्याचे सांगत आहेत. ठराविक काळासाठी सर्व डिजिटल उपकरणांपासून दूर राहणे ,मानसिक शांतता आणि तणावग्रस्त जीवनशैलीला प्राधान्य देणे, आठवड्यातून किमान एक दिवस तरी डिजिटल डिक्टॉस पाळणे म्हणजे डिजिटल डिक्टॉस होय.जे चरितार्थ चालवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कामाच्या ऐवजी दिवसतील बराच वेळ मोबाईलवर टाईमपास करत असतील त्यांनी रात्रीच्या झोपण्यापूर्वी किमान दोन तास मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट, टीव्ही पासून अलिप्त राहिले पाहिजे. काहीजण तर कार्यालयीन वेळेत आपल्या कार्यालयातच मोबाईलवर रील पाण्यापासून गेम खेळण्यापर्यंत तासंतास घालवत असतात. त्यांना त्यांची चूक स्पष्टपणे दाखवून देण्याची नितांत गरज आहे. वाचन संस्कृती रुजवायची असेल तर असे अडथळे प्रयत्नपूर्वक दूर करावे लागतील.
त्याचबरोबर एका ताज्या अहवालात इंटरनॅशनल मायोपिया इन्स्टिट्यूटने दिलेला इशाराही लक्षात घेण्याची गरज आहे. स्क्रीनच्या अतिवापरामुळे मायोपिया म्हणजे दूरचे धुसर दिसणे हा आजार वाढत असून सध्या जगभरातील तिस टक्के लोक त्याने ग्रस्त आहेत. २०५० पर्यंत जगातील निम्म्या लोकसंख्येला असा त्रास होईल असे या अहवालात म्हटले आहे. सतत स्क्रीन कडे पाहिल्याने डोळ्यातील ओलावा कमी होऊन डोळे कोरडे होतात. पापणी लावण्याचे प्रमाण कमी झाल्याने ही डोळे कोरडे होतात.डोळ्यांवर प्रचंड ताण येतो. दृष्टीतील दुसरता वाढते. स्क्रीन मधील ब्लू लाईट चा परिणाम झोप कमी होण्यात होतो.
आधुनिकीकरणाच्या नव्या संकल्पनेत करोडो लोकांचा ‘ स्क्रीन टाईम ‘ मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. तसेच सतत व्यस्त असल्याच्या,कामाचा ताण असल्याच्या,दमून जात असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. मात्र या तक्रारीना आपण स्वतः जबाबदार किती ? याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. ‘डेटा दीड जीबी आणि सारा गाव बीझी ‘ही नवी म्हण आता समाज जीवनात रूढ झाली आहे.परिणामी इंटरनेटचा अतिवापर होतो आहे. तो कामापेक्षा बिनकामाचा जास्त होत आहे . तसेच सायबर क्राईम च्या वाढत्या घटना सुद्धा लक्षात घेण्याची गरज आहे.
मोबाईलवर गेम खेळणे ,रील्स पाहणे, मालिका पाहणे यामध्ये दिवसातील तासनतास वाया घालवले जात आहेत. यात अबाल-वृद्ध -स्त्री-पुरुष अशा साऱ्यांचा समावेश आहे.आपल्या कुटुंबातील माणसांकडे दुर्लक्ष करून मोबाईल वरील आभासी जीवनात स्वतःला व्यस्त ठेवणे हे गंभीर मानसिक अनारोग्याचे लक्षण आहे. स्वतःकडे पाहण्याऐवजी दुसऱ्याच्यात डोकावणे हा प्रकार वाढत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे एकाकीपणा आणि चिडचिडेपणा यामध्ये कमालीची वाढ होत आहे. डोळ्यांसह आरोग्याच्या अनेक तक्रारी निर्माण होत आहेत. व्यायामासाठी वेळ नाही म्हणणारे अनेकजण दिवसातील पाच-सहा तास मोबाईलवरील बिनकामी कामात सहजपणे मग्न असतात हे वास्तव आहे. जीबी संपवण्यालाच बिझी म्हणत राहणे शहाणपणाचे नाही. तर ते आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे आहे.
दररोज करोडो मानवी तास कौटुंबिक-सामाजिक संवादा ऐवजी, श्रमा ऐवजी, संपत्ती निर्मिती ऐवजी एकाकीपणा ओढवून घेण्यात, आणि माणूस म्हणून खिळखिळे होण्यात खर्च होत असतील तर हे अतिशय उग्र स्वरूपाचे राष्ट्रीय संकट आहे.या साऱ्यातून मोठे प्रश्न निर्माण होत आहेत असे तज्ञ सांगत आहेत. मोबाईलचे व्यसन हा एक वाढता गंभीर आजार बनून घराघरात शिरला आहे. तो प्रत्येकाच्या हातात हात घालतो आहे.मानसोपचार तज्ञांकडे येणाऱ्या रुग्णात स्क्रीनवर अधिक वेळ घालवणाऱ्याचे प्रमाण अतिशय वाढलेले आहे. तेव्हा प्रत्येकाने या गोष्टीचा अधिक गांभीर्याने विचार केला पाहिजे. दिवसभरातील आपला वेळ नेमका कुठे खर्च होतो ?त्यातून निष्पन्न काय होते ? आपण खरंच अति श्रमाने त्रस्त आहोत का ? आपण खरे श्रम किती करतो ?आणि श्रमपरिहार म्हणून विरंगुळा मिळवण्यासाठी मोबाईलवर किती तास असतो याचा विचार करण्याची गरज आहे. कारण हा धोका व्यक्ती ,कुटुंब आणि समाज असा टप्प्याटप्प्याने ग्रासत चालला आहे.आणि एकाकीपणा, चिडचिडेपणा , दुराभाव निर्माण करणारा आहे. मोबाईलच्या अती व्यासनापायी आपण कशाचे मोल देत आहोत ? याचा प्रत्येकाने साकल्याने विचार करण्याची गरज आहे. वाचन संस्कृतीतील बदलाचा विचार करत असताना याही मुद्द्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली छत्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)
मोबाईल : आत्मविकास की आत्महत्या

यावर आपले मत नोंदवा